वांद्रे - केंद्र सरकारच्या नोटबंदी धोरणानंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे चालू असलेली वाटचाल यामुळे बँकांना खूप मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा लागत आहे. या तंत्रज्ञानामधील बदलते प्रवाह, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांबाबत माहिती देण्यासाठी 'आयबेक्स इंडिया 2017' चे आयोजन करण्यात आले. 19 ते 21 जानेवारी दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये करण्यात आले आहे.
बँकिंग समुदायासाठी वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे जगभरातील 150 प्रदर्शनकर्ता, आयबेक्स इंडिया 2017 यामध्ये उत्पादने, उपाय आणि सेवा प्रदर्शित करतील. ज्यामध्ये भौतिक आणि आयटी सुरक्षा, बँकिंग ऑटोमेशन, कार्ड्स आणि पेमेंट्स, एटीएम तंत्रज्ञान, रिकंसिलेशन प्रणाली, आयटी पायाभूत सुविधा/ सेवा/ उपाय, शिक्षण, प्रशिक्षण, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली आणि ऊर्जा उपाय यांचा समावेश असेल. त्याचबरोबर या 3 दिवसीय कार्यक्रमात तंत्रज्ञानातील ट्रेंड्स आणि बँकिंग क्षेत्रात भविष्यातील संधी आणि आव्हाने याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल.