पेट्रोल आणि डिझेलचे चढे भाव पाहता इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि सायकलची सध्या क्रेझ वाढत आहे. यामुळे कंपन्या नवनवीन उत्पादनं बाजारात आणत आहेत. यात आता आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे एका नवीन इलेक्ट्रिक सायकलची. लेक्ट्रो ई-मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेडनं (Lectro E-Mobility Solutions Ltd) ही सायकल बाजारत आणली आहे. यासोबतच 'टाउनमास्टर इलेक्ट्रिक सायकल' (Townmaster Electric Bicycle) देखील बाजारात आणली आहे.
१) ई-सायकल एकदा चार्ज केल्यावर तीन तास चालवू शकता. तर एका चार्जमध्ये तुम्ही ३० ते ४० किलोमीटर अंतर कापू शकता.
२) सस्पेंशन, कायम हेडलाइट, अंतर्गत केबल राउटिंग आणि डबल डिस्क ब्रेक यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये यात आहेत. यामुळेच ही ई-सायकल एक सुरक्षित आणि अपिलिंग वाहन बनते.
३) या सायकलचं युनायटेड किंगडममध्ये डिझाइन केलेलं असून, त्यात बॅटरी सेफ्टीसाठी इन्सुलेटेड बॅटरी सिस्टम आणि केंडाचे के शिल्ड-पंचर रेजिस्टंट टायर्स आहेत. हे रायडरला त्यानुसार मोड बदलण्याचा पर्याय देखील देते.
सायकलची किंमत भारतात ३० हजार ९९९ रुपये आहे. टाउनमास्टर ही एक थ्रॉटल ई-बाईक आहे आणि आपण केवळ नियमित प्लग पॉईंटच्या मदतीनं ही सायकल चार्ज करू शकता. म्हणजेच ही सायकल चार्ज करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही विशेष चार्जिंग स्टेशनवर जावे लागणार नाही.
हेही वाचा