Advertisement

वन प्लस ७ टी मोबाईल आणि टीव्ही लाँच

बहुप्रतीक्षित OnePlus 7T मोबाइल आणि वनप्लस टीव्ही भारतात लाँच झाला.

वन प्लस ७ टी मोबाईल आणि टीव्ही लाँच
SHARES

बहुप्रतीक्षित OnePlus 7T मोबाइल आणि वनप्लस टीव्ही भारतात लाँच झाला. नवीन स्मार्टफोनमध्ये वेगवान चार्जिंगसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० मिनिटांत बॅटरी ५० टक्के चार्ज होणार. वनप्लसचे सीईओ पेटे लाउ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर मोबाइलच्या तुलनेत २३ टक्के वेगानं बॅटरी चार्ज होईल.

OnePlus 7 T चे फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले आहे. १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट असतील. फोटोसाठी ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि १६ मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ३,८०० एमएच बॅटरीची क्षमता असेल. यामध्ये पड्रैगन ८५५+ प्रोसेसर आहे.


३ रीअर कॅमेरे

One plus 7T मध्ये ३ रीयर कॅमेरा आहेत. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सोनी आयमॅक्स ४७१ सेंसर आहे. प्रायमरी सेन्सर ४८ मेगापि्सलचा आहे. सॅकेंडरी कॅमेरा १२ मेगापिक्सला आहे. सेल्फी कॅमेरा एचडिआर, स्क्रिन फ्लॅश, फेस रीटचिंग आणि टाईम लॅप्स सारखे फिचर यात आहेत. याशिवाय एफ/.६ अपार्चर, ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज आणि फेस डिटेक्शन सारखे पिचर देखील देण्यात आले आहेत.

वनप्लस टीव्ही 

वनप्लस टीव्ही मध्ये ओएलइडी पॅनल नसणार आहे. एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही ५५ इंच वेरियंटमध्ये लाँच झाला. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार. ८ इनबिल्ड स्पिकर टीव्हीमध्ये आहे.





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा