व्हॉट्सअॅपचं (WhatsApp) 'डिसअपिअरिंग मेसेज’ (disappearing messages) फिचर आता भारतातही उपलब्ध झालं आहे. युजर्स आयओएस (iOS), अँड्रॉइड (Android), केएआयओएस (KaiOS), वेब (web) आणि डेस्कटॉपवरही (desktop) त्याचा वापर करू शकतात.
या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरील मीडिया फाईल्ससह सर्व मेसेज सात दिवसांनंतर आपोआप दिसेनासे होतात. हे फिचर युजर्सना स्वतः एनेबल करावं लागेल. ग्रुप चॅटससाठी देखील हे फिचर वापरता येईल. पण त्यासाठी हे फिचर सुरू करायचे किंवा नाही हा निर्णय ग्रुपच्या अॅडमिनवर अवलंबून असेल.
एखाद्या युजरनं मेसेज आपोआप डिलिट होण्याआधी बॅकअप घेऊन ठेवला, तर ती फाईल कायमस्वरूपी सेव्ह होईल. हे फिचर ऑटो-डाउनलोड झाल्यास मीडिया फाईल्स फोनवर सेव्ह होतील, पण चॅटमधून सात दिवसांनंतर ती फाईल दिसेनाशी होईल.
डिसअपिअरिंग मेसेजला तुम्ही रिप्लाय केलेला असेल तर सात दिवसांनंतर तो मेसेज दिसत राहील. हे फिचर कार्यान्वित करण्याआधीचे मेसेजेस, मीडिया फाईल्सवर याचा काहीही परिणाम होणार नाही. हे नवीन फिचर दिसत नसेल, तर व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन वापरावं लागेल.
हेही वाचा