Advertisement

लोकसंगीताची मजा अनुभवायचीय?, 'लोकरंग महोत्सवा'ला या!


लोकसंगीताची मजा अनुभवायचीय?, 'लोकरंग महोत्सवा'ला या!
SHARES

पाश्चात्य संगीताच्या वादळात लोकसंगीत हरवून गेल्यासारखं वाटत असलं, तरी त्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही. उलट स्वत्वाच्या शोधात असणारी, संवेदना बोथट झालेली गर्दी लोकसंगीताचा मागोवा घेताना दिसते. लोकसंगीताची हीच महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 'लोकरंग महोत्सवा'चे मुंबईत आयोजन करण्यात आले असून 28 ते 30 जून असे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.


येथे होणार कार्यक्रम

यंदाच्या 'लोकरंग महोत्सवा'त 'माझा महाराष्ट्र' ही संकल्पना घेण्यात आली आहे. या संकल्पनेतून रसिकांपुढे महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, खाद्य, लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचा नजराणा पेश करण्यात येणार आहे. 28 जूनला सायंकाळी 7 वाजता साहित्य संघ मंदीर गिरगाव, 29 जून सायं 7 वाजता दामोदर नाट्यगृह, परळ आणि 30 जून सायंकाळी 7 वाजता साहित्य संघ मंदीर, गिरगाव या ठिकाणी प्रेक्षकांना लोकसंस्कृतीचा अनुभव घेता येणार असून 'मुंबई लाइव्ह' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.


पोवाडा, भारूड, गोंधळाचं जतन

महाराष्ट्राचं लोकसंगीत ही महाराष्ट्राची खरी ओळख. पण मराठी लोकसंगीत म्हटलं की बहुतांश प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येते ती फक्त लावणी. पोवाडा, भारूड, गोंधळ असे प्रकार अनेकांना ऐकूनही माहीत नाहीत, हे कटू सत्य आहे. वासुदेवगीत, ओव्या हे प्रकार तर अक्षरश: दुर्मिळ झाले आहेत. गेल्या 17 वर्षांपासून 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियाना'तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकसंगीतातून भारतदर्शन, अरण्यपर्व, परंपरा या नवनवीन संकल्पनाही राबवण्यात येत आहेत.


कार्यक्रम पूर्णपणे मोफत

संतोष परब यांच्या लेखणीतून 'माझा महाराष्ट्र' ही संकल्पना साकारली आहे. तर संतोष आंब्रे यांनी या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. निवेदन, वादन, नृत्य असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. केवळ लोकसंस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने सुरू केलेला हा कार्यक्रम मुंबईकरांसाठी पूर्णपणे मोफत आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा