कोरोना संकटामुळे देशभरातील रेल्वेसेवा आणि लोकल ट्रेन बंद राहिल्याने पश्चिम रेल्वेचं तब्बल १९५९ कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालं आहे. यापैकी २९१ कोटींचं नुकसान हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद असल्यामुळे झालं आहे. तर १६६८ कोटींचे नुकसान हे लांब पल्ल्याच्या आणि इतर सेवा बंद असल्यामुळे झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.
देशात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने पश्चिम रेल्वेला लोकांच्या तिकिटांचे पैसे परत करावे लागले. १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत पश्चिम रेल्वेने तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांना ४०७.८४ कोटी रुपये परत केले आहेत. यामध्ये मुंबई विभागात १९५.६८ कोटी रुपये प्रवाशांना परत करण्यात आले.
कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने सामान्य प्रवाशांसाठी मुंबईतील लोकल सेवा बंद आहेत. केवळ सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, यामुळे मुंबईत कामासाठी येणाऱ्या अनेक नोकरदारांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल लवकर सुरु कराव्यात, अशी मागणी सातत्याने जनतेकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाची साथ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करणार का, याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -
सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा मुंबईत कोरोनाचे
जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द