Advertisement

मागाठाणे आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन

रविवारी बोरिवलीतील मागाठाणे आगारात बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले त्यामुळे पश्चिम उपनगरातील उत्तरेकडील भागातील बससेवा विस्कळीत झाली.

मागाठाणे आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन
SHARES

15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला होता. मात्र प्रशासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या (BEST) बेस्टच्या 25,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना अद्याप कोणताही बोनस मिळालेला नाही. 

यामुळे रविवारी बोरिवलीतील (borivali) मागाठाणे (magathane) आगारात बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन (protest) केले. त्यामुळे पश्चिम उपनगरातील (western suburb) उत्तरेकडील भागातील बससेवा विस्कळीत झाली होती.

वाढत्या तणाव लक्षात घेता प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि युनियन प्रतिनिधींची आज (सोमवार) बैठक होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, अनेक बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांनी 3 नोव्हेंबरच्या सकाळी कामावर जाण्याचा निर्णय घेतला होता. एकूण नियोजित 1,266 बसपैकी फक्त 1,159 बसेस मार्गस्थ झाल्या होत्या.

काही तासांतच हा प्रश्न सोडवण्यात आला आणि बसेस पुन्हा रस्त्यावर आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अनेक संघटनांना त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आज (सोमवार) बेस्ट (best) व्यवस्थापनासोबत बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

रविवारच्या पहिल्या सत्रात बेस्टने जवळपास 82 ते 87 टक्के चालक आणि वाहक कामावर रुजू करून घेतले. “सेवेतील व्यत्यय प्रामुख्याने बोरिवली, कांदिवली आणि दहिसरमध्ये जाणवला होता, परंतु दुपारपर्यंत वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर आली,” असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वेट-लीज ऑपरेटर हंसा ग्रुपने अलीकडेच 280 बसेस सेवेतून मागे घेतल्या. त्यामुळे बेस्ट बसेसच्या ताफ्याचा विस्तार करण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड देत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवण्याच्या बेस्टच्या क्षमतेवर ताण आला आहे.



हेही वाचा

क्षणिक सुखासाठी कुटुंब फोडणार का : शरद पवार

आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा