Advertisement

1 मार्चपासून बेस्टच्या 'स्मार्ट' कार्ड धारकांना बसमध्ये प्रथम प्रवेश

ही सुविधा १ मार्चपासून उपलब्ध होणार असून यामुळे ही सेवा नसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

1 मार्चपासून बेस्टच्या 'स्मार्ट' कार्ड धारकांना बसमध्ये प्रथम प्रवेश
SHARES

मुंबई बेस्ट प्रशासनाने डिजिटल प्रणालीचा वापर करून ‘बेस्ट चलो अ‍ॅप’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ योजना सुरू केली होती. या माध्यमातून डिजिटल पद्धतीने तिकीट प्रदान करण्याची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. ही सुविधा १ मार्चपासून उपलब्ध होणार असून यामुळे ही सेवा नसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

बेस्ट बसमध्ये आधी प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या मोबाइलच्या माध्यमातून ‘बेस्ट चलो अ‍ॅप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’द्वारे प्रवासभाडे भरावे लागले. डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण होणार नाही, व प्रवासास अडचण येणार नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

तिकीटासाठी डिजिटल पद्धतीचा प्रसार आणि वापर मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी बसमधून प्रवास करणाऱ्या व ही सेवा घेणाऱ्या प्रवाशांना काही सवलत देण्यात येणार आहे. याची सुरूवात १ मार्चपासून सुरू होणार आहे. ‘बेस्ट चलो अ‍ॅप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.

विशेष करून बस ज्या आगारातून सुटेल त्या स्थानकावर अशा प्रवाशांना प्राधान्य दिले जाईल. ऑनलाइन रिचार्जच्या सुविधेसह बसमधील वाहकाकडूनदेखील स्मार्ट कार्ड रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.



हेही वाचा

बेस्ट बस, मेट्रोसाठी एकच पेटीएम ट्रान्झिट कार्ड, मार्चमध्ये होणार लाँच

ठाण्यात रस्त्यावरील मुलांसाठी मोबाईल बस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा