Advertisement

सोमवारपासून मध्य रेल्वेवर धावणार बम्बार्डिअर लोकल

सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान बम्बार्डिअर लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसंच एक फेरी बदलापूरपर्यंत देखील चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातून सकाळी ६.५७ मिनिटांनी पहिली बम्बार्डिअर लोकल सोडण्यात येईल. ती कल्याणला ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

सोमवारपासून मध्य रेल्वेवर धावणार बम्बार्डिअर लोकल
SHARES

येत्या सोमवारपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर बम्बार्डिअर लोकल धावणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान या लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसंच एक फेरी बदलापूरपर्यंत देखील चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातून सकाळी ६.५७ मिनिटांनी पहिली बम्बार्डिअर लोकल सोडण्यात येईल. ती कल्याणला ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे.


मागणीनुसार दाखल

मध्य रेल्वेवर अत्यंत आरामदायी, चांगलं व्हेंटीलेशन आणि मोकळी जागा असणाऱ्या बम्बार्डियर लोकल चालवाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मेधा लोकलपैकी २ लोकल मध्य रेल्वेवर आल्या होत्या, त्या बदल्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील ४ बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेला देण्याचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार, पहिल्या २ बम्बार्डियर लोकल मार्च २०१८ पर्यंत मरेच्या ताफ्यात येणं अपेक्षित होतं.



तांत्रिक बदल

पण, त्यापैकी एका लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करुन ही लोकल मेन लाईनवर सोमवारपासून चालवण्यात येणार आहेत. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या चालवण्यात येतील. सीएसएमटी ते कल्याण स्थानकापर्यत ११ फेऱ्या आणि १ फेरी बदलापूरपर्यंत चालविण्यात येणार आहे.


वेगवान लोकल

बम्बार्डियर लोकल सीएसएमटी-कल्याण मार्गावर १०० किमीच्या वेगाने चालविण्यात येणार आहे. तर कल्याण स्थानकापुढे १०५ किमीच्या वेगाने चालवण्याची परवानगी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त संजय कुमार जैन यांनी दिली.



हेही वाचा-

१ जानेवारीपासून पश्चिम मार्गावर एसी लोकल

अाता गोरेगांवहून थेट करा पनवेलपर्यंतचा प्रवास

लोकल ट्रेनच्या डब्ब्यातलं अतरंगी 'हंग्री जेडी' हॉटेल!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा