Advertisement

मोबाइल अॅपद्वारे प्रवाशांना मिळणार लोकलची माहिती

मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता लोकलच्या 'रिअल टाइम' ठिकाणाची माहिती मोबाइलवर मिळणार आहे

मोबाइल अॅपद्वारे प्रवाशांना मिळणार लोकलची माहिती
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण प्रवाशांना आता लोकलच्या 'रिअल टाइम' ठिकाणाची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. अनेकदा प्रवासी वेळेत लोकल पकडण्यासाठी धावपळ करत स्थानकात जातात. परंतु, लोकल उशीरा येणार असल्यानं प्रवाशांना स्थानकात उभं राहावं लागतं. मात्र, या मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना स्थानकात येण्यापूर्वीच लोकलची वेळ समजणार आहे.


मोबाईल अॅपची मदत

एखादी लोकल स्थानकात येण्याची योग्य वेळ प्रवाशांना स्थानकातील इंडीकेटर्सवर दिसते. मात्र, स्थानकातील काही  इंडिकेटर्स बिघडले असल्यामुळं प्रवाशांना लोकलसाठी स्थानकात थांबून राहावं लागतं. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला असून ऑगस्ट अखेरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.


निविदा प्रक्रिया पूर्ण

जीपीएसवर आधारित या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना एखादी लोकल प्लॅटफॉर्मवर येण्याकरीता किती कालावधी लागेल, याची माहिती मिळणार आहे. तसंच, लोकलमध्ये कोणताही बिघाड झाल्यास त्याची माहिती देखील या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येणार आहे. दरम्यान, या मोबाइल अॅपसाठी लागणारी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एका खासगी कंपनीकडं या अॅपचं काम देण्यात आलं आहे.

Advertisement
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा