Advertisement

प्लॅटफॉर्म गर्दीमुक्त होणार, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

प्लॅटफॉर्म वरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे अनेक योजना आखत आहे. गर्दी कमी करण्यासाठी आता रेल्वेने आणखी एक पाऊल उचलले आहे.

प्लॅटफॉर्म गर्दीमुक्त होणार, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
SHARES

रेल्वे प्रशासनाने रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे फलाटावरील गर्दी कशी कमी करता येईल,याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानकांत पाहणी केली होती. पाहणी केल्यानंतरच महत्त्वाचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला यासंबंधात माहिती दिली होती. रेल्वे फलाट गर्दी मुक्त करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, गाडी फलाटावर आल्यानंतर सीट मिळवण्यासाठी नागरिक लोकलमध्ये चढण्यासाठी घाई करतात. अशावेळी कधी कधी चेंगराचेंगरीची घटना घडतात. किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्या आल्यानंतर अधिक गर्दी वाढते. त्यावर रेल्वेने हा तोडगा काढला आहे. 

रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली, वडाळा यासारख्या काही स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली असल्याने खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार आहेत.

रेल्वे फलाटांवरील स्टॉलमुळं अधिक जागा व्यापली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

तसंच, नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानात सहज खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. त्यामुळंच गर्दीच्या दृष्टीने रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहेत. सध्या कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड या गर्दीच्या स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

दरम्यान, यापूर्वी दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकातील फलाटांवरील स्टॉल हटवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या स्टॉल धारकांना स्थानकातच पर्यायी जागा देण्याचा विचार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 



हेही वाचा

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये होणार बदल

मोनो रेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा