Advertisement

रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि दादर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची नोंद झाली, ज्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला.

रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
प्रतिकात्मक छायाचित्र
SHARES

मध्य रेल्वे (central railway) मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने मंगळवारी सकाळी रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला. ज्यामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन गाड्या उशीराने धावत होत्या.

मध्य रेल्वेवरील माटुंगा (matunga) आणि दादर (dadar) स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा (crack) गेल्याची नोंद झाली, ज्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला.

"सकाळी 9:25 वाजता ट्रॅक सुरक्षित घोषित करण्यात आला आणि गाड्या ताशी 30 किमीच्या मर्यादित वेगाने धावत होत्या. यामुळे सर्व सेवांमध्ये 10 ते 15 मिनिटे विलंब झाला," असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

मिड-डेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत वाहतूक पुन्हा सुरळीत होईल असे आश्वासन दिले. दरम्यान, अलिकडेच पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावरून मुंबईत (mumbai) प्रवेश करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई विभागातील वैतरणा स्थानकाजवळ ट्रॅकमध्ये भेगा पडल्यामुळे 30 मिनिटांपर्यंत विलंबाने (delay) धावल्या.

21 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता अप-लाइन मार्गावर ही समस्या आढळून आली आणि सकाळी 8:00 वाजेपर्यंत दुरुस्ती पुर्ण करण्यात आली. ज्यामुळे गाड्या पुन्हा सुरू होऊ शकल्या. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रॅकचा प्रभावित भाग बंद केला.


हेही वाचा

हापूसचे वाशी मार्केटमध्ये आगमन

मुंबई मेट्रो मार्ग 8 ची जबाबदारी सिडकोकडे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा