Advertisement

विसर्जनासाठी मध्य रेल्वेवर ८ जादा गाड्या


विसर्जनासाठी मध्य रेल्वेवर ८ जादा गाड्या
SHARES

गणेश विसर्जनाहून घरी परतणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून जादा लोकलचे नियोजन करण्यात आले आहे. बाप्पाला निरोप दिल्यानंतर घरी परतण्यासाठी मध्य रेल्वेकडून सीएसटीएम ते कल्याण/ठाणे तसेच हार्बर मार्गावरील सीएसटीएम ते पनवेल मार्गावर अशा ८ ज्यादा लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर या जादा लोकल ५ आणि ६ सप्टेंबरच्या रात्री चालविण्यात येणार आहेत. सीेएसटीएमहून मध्यरात्री १.३० वाजता सुटणारी लोकल कल्याणला मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. तर दुसरी लोकल सीएसटीएमहून मध्यरात्री २.३० वाजता सुटून ठाण्याला ३.३० वाजता पोहोचेल.
याचबरोबर कल्याणहून मध्यरात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री २.३० वाजता पोहोचेल. तर ठाण्याहून २ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर सीएसटीएमहून मध्यरात्री दोन लोकल सुटतील. सीएसटीएमहून १.३० वाजता सुटणारी लोकल पनवेलला मध्यरात्री २.५० वाजता आणि २.४५ वाजता सुटणारी लोकल ४.०५ वाजता पोहोचेल. तसेच पनवेलहून मध्यरात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री २.२० वाजता पोहोचेल आणि पनवेलहून १.४५ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला ३.०५ वाजता पोहोचेल.
विसर्जनासाठी चौपाट्यावर येणाऱ्या गणेशभक्तांना या जादा लोकलचा फायदा होणार आहे.



हे देखील वाचा -

गणेश विसर्जन: या मार्गाने करू नका प्रवास, नाहीतर अडकाल



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा