एसटी महामंडळाच्या वर्ग १ आणि २ अधिकारी पदासाठी ऑनलाइन परीक्षा शुक्रवार, १७ ते रविवार १९ मे या कालावधीत होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे एसटी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत.
एसटीच्या वर्ग १ व २ अधिकारी पदाच्या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेले मोबाइल आणि ई-मेलवर परीक्षेसंदर्भातील लघुसंदेश (एसएमएस) पाठवण्यात आला आहे. परीक्षार्थींनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र प्राप्त करून किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून एकूण १०० प्रश्न असणार आहेत. परीक्षेचा कालावधी दीड तासाचा असणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त झालं नसल्यास १८०० ५७२२ ००५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसंच, उमेदवारांनी कोणतेही अवैध प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन एसटी महामंडळाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
'महामोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा' - राज ठाकरे