प्रवाशांच्या सुविधेसाठी बुलेट ट्रेन (bullet train) कॉरिडॉरमधील सर्व स्थानके आधुनिक सुविधा आणि प्रगत यंत्रणांनी सुसज्ज करण्यात येत आहेत. तिकीट सुविधा, वेटिंग रूम, बिझनेस-क्लास लाउंज, नर्सरी, वॉशरूम, माहिती कक्ष हे सर्व स्थानकांवर उपलब्ध असणार आहेत. तर, बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्थानकांवर 90 एस्केलेटरही (escalators) बसवण्यात येणार आहेत.
मुंबई (mumbai) ते अहमदाबाद दरम्यान 508 किमी बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशी एकूण १२ स्थानके बांधण्यात येणार आहेत.
यामध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (bandra-kurla Complex), ठाणे (Thane), विरार (Virar), बोईसर (Boisar), वापी (Vapi), बिलीमोरा (Bilimora), सुरत (Surat), भरूच (Bharuch), बडोदा (Baroda), आनंद (Anand), अहमदाबाद आणि साबरमती (Ahmedabad and Sabarmati) या स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांची कामे सुरू असून कामाला गती देण्यात येत आहे. या स्थानकांमध्ये एस्केलेटर बसवण्यात येत आहेत. बुलेट ट्रेन मार्गावरील पहिले एस्केलेटर आणंद स्थानकात बसविण्यात आले आहे. तसेच गुजरातमधील 8 स्थानकांवर आणि महाराष्ट्रातील 4 स्थानकांवर 42 एस्केलेटर बसविण्यात येणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांचे काम सुरू झाले आहे. बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे.
हेही वाचा