Advertisement

कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुकर, १० नवीन क्रॉसिंग स्थानकं...

कोकण रेल्वेचा प्रवास सुकर होणार आहे.

कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुकर, १० नवीन क्रॉसिंग स्थानकं...
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर दहा नव्या क्रॉसिंग स्थानकांची भर पडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास सुकर होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळ वाचण्यासाठी, नवीन गाडय़ा सेवेत याव्या यासाठी कोकण रेल्वेनं क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबवला आहे. हा प्रकल्प मार्च अखेरीस पूर्ण झाल्याची माहिती कोकण रेल्वेनं दिली.

इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबनी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आर्चिणे, मिरजन, इनजे अशी दहा क्रॉसिंग स्थानके सेवेत आली आहेत.

गर्दीच्या वेळी मोठय़ा संख्येने जादा गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण रेल्वेवर झालेल्या क्रॉसिंग स्थानक प्रकल्पामुळे रेल्वेला आणि प्रवाशांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वेवर आठ लूप लाईनही सेवेत आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि हे फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. अधिक संख्येने गाडय़ांना सामावून घेण्यासाठी आणि ट्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी स्टेशन परिसरात लूप लाइन तयार केल्या जातात. ज्यामध्ये अनेक इंजिनांसह पूर्ण लांबीची मालगाडी बसू शकते.

दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी वर्षभरापासून तयारी करत असतात. यंदा गणपती बाप्पचे आगमन 31 ऑगस्टला होणार आहे. यामुळे रेल्वे तिकिटांचे 120 दिवस आधीपासून सुरु होणारे रेल्वे तिकिटांचं आरक्षण एप्रिलअखेरीस सुरु होत आहे.



हेही वाचा

मुंबई ते गुजरात "या" ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू

एसटी महामंडळ १०९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा