Advertisement

कुर्ला बस अपघात : चालकाला मिनी बस चालवायचाच अनुभव

10 दिवस आधीच त्याने मोठी बस चालवण्यासा सुरुवात केली होती, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

कुर्ला बस अपघात : चालकाला मिनी बस चालवायचाच अनुभव
SHARES

कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बेस्ट अपघातातील मृत्युमुखींची संख्या वाढली आहे. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण जखमी झाले आहेत. भरधाव बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

पोलिसांनी चालक संजय मोरे याला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

काल सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून भरधाव वेगात अंधेरीकडे जात होती. यावेळी गडीत तब्बल 60 प्रवासी होते. यावेळी भरधाव बसने रस्त्यावरील वाहतांना व नागरिकांना धडक दिली. या भीषण अपघातामुळे कुर्ला परिसरात गोंधळ उडाला.

अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

नागरिकांनी बस चालक संजय मोर याला पकडून चोप दिला. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेत त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. दरम्यान, आज घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे. तर कुर्ला बस स्थानक आज बंद ठेवण्यात आले आहे.

संतोष मोरेला मोठे वाहन चालवण्याच्या अनुभव नव्हता

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे याला मोठे वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे. मोरे हा बेस्टमध्ये 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून भरती झाला होता. यापूर्वी तो दुसऱ्या ठिकाणी कामाला होता.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला, या पूर्वी त्याने कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे सांगितले. संजय मोरे हा घाटकोपरच्या असल्फा येथे राहत असून लॉकडाऊननंतर तो बेस्टमध्ये कंत्राटी तत्वावर कामाला लागला.

अपघातग्रस्त इलेक्ट्रीक बस त्याने 10 दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. ही बस कशी चालवायची याचे ट्रेनिंग देखील त्याला नव्हते.



हेही वाचा

मुंबईला 250 नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळणार

भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा