Advertisement

माटुंगा स्थानकाचंही नाव बदलण्याची मागणी


माटुंगा स्थानकाचंही नाव बदलण्याची मागणी
SHARES

नुकतंच एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यात आलं. त्यानंतर अाता माटुंगा स्थानकाचंही नाव बदलण्याची मागणी होत अाहे. माटुंगा रेल्वे स्थानकाचं नाव मरुदेवी असं करण्याची मागणी श्री मरुबाई गावदेवी मंदिर व समाजाकडून करण्यात आली आहे.


रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून मागणी 

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांच्या नावात बदल करण्यचा धडाकाच रेल्वेनं लावला आहे.  गुरुवारी १९ जुलैपासून एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यात आलं. अाता माटुंगा स्थानकाचं नाव मरूदेवी करण्याची मागणी होत अाहे. माटुंगा येथे असलेल्या मरुबाई देवीच्या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटीश राजवट असताना १८८८ साली माटुंगा बेटाचा विकास करण्यासाठी या मंदिराकडून जागा देण्यात आली होती. तसेच पुर्वी या बेटाला मरुबाई टेकडी गाव म्हटलं जात होतं, अशी माहितीही मंदिराकडून देण्यात आली आहे.  या मंदिर संस्थानाकडून रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे.



मुंबई सेंट्रल, किंग्ज सर्कलचं नामांतर

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं याअगोदरही बदलण्यात अाली अाहेत. अाता किंग्ज सर्कल स्थानकाचं नामकरण पार्श्वनाथ स्थानक तर मुंबई सेंट्रलचं नाव जगन्नाथ शंकर शेठ असं नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.  



हेही वाचा - 

मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास खोळंबली

आता ऑनलाईन तिकीट महाग!




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा