Advertisement

संसदेच्या स्थायी समितीची 'सीएसटी'ला भेट


संसदेच्या स्थायी समितीची 'सीएसटी'ला भेट
SHARES

एका बाजूला दर दिवसाआड विविध तांत्रिक कारणांमुळे लोकलसेवा विस्कळीत होत असताना उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, याचा आढावा घेण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बुधवारी भेट दिली.

लोकल कोणत्या तंत्रज्ञानावर धावते, यंत्रणा कशी काम करते, प्रवाशांना कुठल्या सुविधा दिल्या जातात या बाबी स्थायी समिती सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. या समितीत गणेश सिंग, गजानन किर्तीकर, ए. टी. नाना पाटील, राजीव सातव, किरीट सोमय्या (विशेष निमंत्रीत) यांचा समावेश होता. या समिती सदस्यांनी प्रवाशांच्याही समस्या जाणून घेतल्या.



किरीट सोमय्या काय म्हणाले ?

  • मुंबईतील रेल्वे अपघात लवादाकडे 2011 पासून प्रकरणे सुनावणीस
  • लवादाकडे 6055 प्रकरणे प्रलंबित
  • देशातील सर्वात जास्त प्रकारणे
  • मुंबईतील लवादामध्ये वाढ व्हावी
  • आणखी एका लवादाची व्हावी स्थापना
  • समिती सदस्याचा सकारात्मक प्रतिसाद



नुकसानभरपाई मिळणार दुप्पट

  • मृतांच्या वारशांना 4 लाखांऐवजी 8 लाख
  • जखमींना 3 लाखांऐवजी 6 लाख
  • रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला उभारणार संरक्षक भिंती
  • दीड वर्षांत काम होणार पूर्ण
  • प्लॅटफॉर्मची उंची 31 डिसेंबर 2017 पर्यंत होणार पूर्ण



हे देखील वाचा -

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा