Advertisement

'ड्रायव्हिंग टेस्ट'मध्ये नापास? एसटी पुन्हा देणार भरतीत संधी

कोकण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन नव्याने ३ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी निवेदनाद्वारे विधानसभा तसंच विधानपरिषदेत दिली.

'ड्रायव्हिंग टेस्ट'मध्ये नापास? एसटी पुन्हा देणार भरतीत संधी
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) ने गेल्या वर्षी कोकण विभागात चालक आणि वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी जाहिरात दिली होती. या पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही 'ड्रायव्हिंग टेस्ट'मध्ये नापास झालेल्या उमेदवारांची पुन्हा चाचणी घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

कोकण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन नव्याने ३ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी निवेदनाद्वारे विधानसभा तसंच विधानपरिषदेत दिली.


मागणीनंतर निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्यावर्षी कोकण विभागात चालक आणि वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्टकरीता पाठवण्यात आलं होतं. त्यात अनेकजण अनुत्तीर्ण झाले होते. त्यामुळे काही उमेदवार तसंच लोकप्रतिनिधींनी ड्रायव्हिंग टेस्टमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची मागणी केली आहे.


कागदपत्रांची पुन्हा छाननी

कोकण प्रदेशातील चालक आणि वाहक पदाच्या रिक्त जागा तातडीने भरणं आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन महामंडळाने ड्रायव्हिंग टेस्टमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुन्हा नव्याने चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच किरकोळ त्रुटीमुळे या चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा छाननी करुन त्यांना संधी देण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा