Advertisement

बेस्टच! इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस 14 जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

नव्या वर्षात बेस्ट बस प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे.

बेस्टच! इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस 14 जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत
SHARES

नव्या वर्षात बेस्ट बस प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) या नव्या वर्षात ५० नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बस लाँच करणार आहेत. १४ जानेवारीपासून या बस मुंबईच्या रस्त्यावर धावणार असल्याची माहिती मिळत आहे.

मकर संक्रातीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ जानेवारीपासून बेस्ट १० इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. आम्ही सप्टेंबरमध्येच नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र, ARAIकडून प्रमाणपत्र न आल्याने या योजनेला विलंब झाला, असं बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांनी म्हटलं आहे.

देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस मुंबईत १८ ऑगस्ट रोजी दाखल झाली. स्विच मोबिलिटी लिमिटेड कंपनीने भारतातच ही बस डिझाईन केली आहे तसेच तयार केली आहे.

ही बस लेटेस्ट टेक्नोलॉजी, अल्ट्रा मॉडर्न डिझाईन, उत्तम सेफ्टी फीचर्स आणि बेस्ट इन क्लास फीचर्ससह सुसज्ज आहे. यामध्ये एकाच वेळी ६५ प्रवासी बसू शकतात. प्रवाशांच्या सोयीनुसार यात आरामदायक सीट्स देण्यात आल्या आहेत.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा