Advertisement

रेल्वे प्रवाशांकरता 'या' सुविधा उपलब्ध


रेल्वे प्रवाशांकरता 'या' सुविधा उपलब्ध
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. कारण रेल्वे प्रशासनाने मुंबई उपनगरातील रेल्वे मार्गावरील प्रवाशांकरता विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहा नवीन पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, नवीन तिकीट कार्यालयं, प्रसाधनगृह, एटीव्हीएम मशीन, इंडिकेटर अशा प्रकारच्या नव्या सुविधा उपनगरी मार्गावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता आणखीनच सुखरक होणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून या सुविधांचा लोकार्पण सोहळा रविवारी खारकोपर स्थानकात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.


नव्या सुविधा अशा

प्रवाशांकरता मध्य रेल्वेच्या सँड हर्स्ट रोड, विद्याविहार, डोंबिवली, उल्हासनगर, कळवा आणि आटगाव स्थानकात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. सीएसएमटी, दादर, एलटीटी, कुर्ला, ठाणे आणि कल्याण स्थामकांमध्ये २०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर परळ, शिवडी, घाटकोपर, भांडुप, कळवा आणि मुंब्रा स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांकरता खुले करण्यात आले आहेत. तसंच, ठाणे, टिळकनगर, वडाळा, चेंबूर, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली या स्थानकांत लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत.


या स्थानकात सरकते जिने

  • सीएसएमटी - २ 
  • लोकमान्य टिळक टर्मिनर्स - ६
  • भायखळा - २  
  • करी रोड - १ 
  • दादर - २ 
  • चेंबूर - २
  • माटुंगा - १
  • मानखुर्द - २
  • घाटकोपर  - २
  • शिवडी -  १
  • नाहूर - १
  • मुलुंड  - १
  • ठाणे - २
  • कळवा - २
  • अंबरनाथ - १
  • कल्याण - २
  • वडाळा - ३
  • आसनगाव - ३
  • कसारा - १
  • शहाड - १
  • कर्जत - १
  • दिवा - १
  • लोणावळा - २
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा