‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो 2अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो 7’ मर्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर सेवेच्या कालावधीत 30 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री 11 वाजता बंद होणारी मेट्रो सेवा 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान रात्री 11.30 वाजता बंद होणार आहे.
असं असेल वेळापत्रक
1. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री 10:20, 10:39, 10:50 आणि 11 वाजता (4 सेवा)
2. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री 10:20, 10:40, 10:50 आणि 11 वाजता ( 4 सेवा)
3. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2 सेवा)
4. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2 सेवा)
5. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री 10:53, 11:12, 11:22 आणि 11:33 वाजता (4 सेवा)
६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री 10:57, 11:17, 11:27 आणि 11:36 वाजता (4 सेवा)
हेही वाचा