बेस्ट उपक्रमानं प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत बेस्ट बस ताफ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २५ मिडी बस लवकरच दाखल झाल्या. या २५ मिडीबस वडाळा डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या या मिनी, मिडी बसचा ताफा लगोलग बसमार्गांसाठी वापरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
सध्या
बेस्टच्या ताफ्यात मिनी,
मिडीची
संख्या १६६पर्यंत पोहोचली
आहे.
याच
नव्या बसच्या आधारे दादर ते
केईएमपर्यंतच्या नवीन मार्गास
सुरुवात करण्यात आली आहे.
ही
एसी बस असून ती दादर रेल्वे
स्थानक ते केईएमपर्यंत धावणार
आहे.
या
बससेवेमुळं केईएम आणि त्या
परिसरातील रुग्णालयात जावे
लागणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या
नातेवाईकांना दिलासा मिळणार
आहे.
बेस्टनं सुरू केलेली ही बस सकाळी ६.५० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.४० वाजता सुटणार आहे. या एसी बसचं तिकीट भाडं ६ रुपये असल्यानं गोरगरीब रुग्ण, नातेवाईकांचं यापुढं टॅक्सीसाठी मोजाव्या लागणारे पैसे वाचणार आहेत. दादरहून केईएम परिसरात जाण्याऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना टॅक्सीचालकांच्या मनमानीस सामोरं जावं लागतं. मात्र, आता बेस्टच्या ए-२१७ क्रमांकाच्या एसी बसमुळं त्याला चाप बसण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा -
रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पालकमंत्र्यांची यादी जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडं मुंबई उपनगरची जबाबदारी