Advertisement

CSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथं ही नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे.

CSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स
SHARES

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुलभ आणि सोशल डिस्टिंग प्रवासासाठी क्यूआर कोडसह फ्लॅप गेट्स वापरण्यास सुरवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथं ही नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे.

“सीएसएमटी इथं क्यूआर कोड्ससह फ्लॅप गेट स्थापित केले गेले आहेत. फ्लॅप गेट्सच्या साहाय्यानं प्रवाशांची तपासणी केली जात आहे. हे प्रवेशद्वार सुरक्षित प्रवासास मदत करतील आणि प्रवाशांमध्ये सामाजिक अंतर  वाढवतील,” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चर्चगेट, लोकमान्य टिळक टर्मिनस तसंच मुंबईतील इतर स्थानकांवरही क्यूआर-कोड सुसज्ज फ्लॅप गेट्स बसवण्यात येतील. क्यूआर कोडसह स्क्रिनिंग अगदी सहजतेनं केलं जातं. प्रवाशांना स्टेशन एंट्री पॉइंटवर त्यांचं ई-तिकिट स्कॅन करणं आवश्यक आहे.

प्राधिकरणानं सांगितलं की, क्यूआर कोड तिकिटं आयआरसीटीसी (इंडियन रेल केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) वेबसाइटद्वारे तयार केली जाऊ शकतात. जे लोक स्टेशनवर तिकिटं घेतात त्यांना त्यांच्या फोनवर क्यूआर कोड प्राप्त होतील.

दरम्यान, लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वेतून प्रवास करीत आहेत. त्यांची नोंद क्यूआर कोड-आधारित तिकिटांद्वारे निश्चित केली गेली होती. विशेषतः आवश्यक असणाऱ्या कर्मचार्‍यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तयार केली गेली. सीएसएमटी, दादर, मुलुंड, कुर्ला, ठाणे, दिवा, घाटकोपर, डोंबिवली, कल्याण, भायखळा, वडाळा, मानखुर्द, पनवेल, टिटवाला आणि बदलापूर स्थानकांवर सध्या ही यंत्रणा वापरली जात आहे.



हेही वाचा

गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा