Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शिवनेरी, शिवशाही आधार

विलनीकरणासह आपल्या अनेक मागणीसाठी एसटी कर्मचारी गेला महिनाभर संपावर गेले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शिवनेरी, शिवशाही आधार
SHARES

विलनीकरणासह आपल्या अनेक मागणीसाठी एसटी कर्मचारी गेला महिनाभर संपावर गेले आहेत. मात्र महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत.

या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून प्राप्त झाले आहे. दादर-पुणे, बोरीवली-ठाणे-पुणे या मार्गावर दर तासाला १ या प्रमाणे ३५ शिवनेरी बसेस गेली १० दिवस सुरळीत सुरू आहेत. तर नाशिक-शिवाजीनगर (पुणे), सातारा-स्वारगेट (पुणे) आणि शिवाजीनगर-औरंगाबाद या मार्गावर ६० शिवशाही बसेस नियमित सुरू आहेत.

या बसेसवर देखील काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तरीही न डगमगता या बसेस सुरू ठेवण्याचा प्रयत्न महामंडळाकडून सुरू आहे. असाच प्रयोग कोल्हापूर-पुणे, पुणे-जळगाव-धुळे या मार्गावर देखील करण्याचा प्रयत्न महामंडळ करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा