वाढत्या उन्हात वीज वापर जास्त होत असून वीज बिल सुद्धा भरमसाठ येत आहे. पण आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, महावितरण कंपनीने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपात करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. महावितरण कंपनीने सादर केलेल्या या प्रस्तावावर सुणावणी झाल्यावर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने 2025-26 या वर्षासाठी वीज दरात कपातीचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे वीज दरात 10 टक्के कपात झाली आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मिळणार आहे. नवे वीज दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
यंदा कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून वीज मागणीत वाढ झाली आहे. वीज वापर वाढल्याने वीज बिल जास्त येत असताना आता वीज दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीज कंपन्यांची प्रत्येक 5 वर्षांनी वीज दर निश्चिती होते. त्याला मल्टी एअर टेरिफ असे म्हणतात. नवे वीज दर एप्रिल महिन्यात लागू होतील. या वीज दर कपातीचा फायदा राज्यातील कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे. 101-300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे. सध्या या गटातील ग्राहकांना एका युनिटसाठी 11.06 रुपये द्यावे लागतात, मात्र दर कपातीनंतर या नागरिकांची आर्थिक बचत होणार आहे.
मुंबईतील चेंबूर वीज निर्मिती केंद्रातून बेस्ट आणि टाटा यांना वीज मिळते. या ठिकाणाहून मिळणारी वीज ही महाग आहे. ग्राहकांना स्वस्त वीज द्यायची असल्यास मुंबईच्या बाहेरुन वीज आणावी लागणार आहे.
हेही वाचा