गेल्या आठवड्याच्या अखेरीस नवी मुंबईतील (navi mumbai) डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियममध्ये ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रम पार पडला. आता 25 आणि 26 जानेवारी रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यामुळे मध्य रेल्वेने (central railway) मुंबई (mumbai) – अहमदाबाद (ahmedabad) दरम्यान चार विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई – अहमदाबाद दरम्यान चार विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या (special trains) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या सेवांचा लाभ ‘कोल्ड प्ले’ च्या संगीत कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांना होईल. लोकमान्य टिळक टर्मिनस – अहमदाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष दोन फेऱ्या धावतील.
गाडी क्रमांक 01155 वातानुकूलित विशेष 25 जानेवारी रोजी रात्री 12.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01156 वातानुकूलित विशेष 26 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 14 तृतीय वातानुकूलित आणि 1 जनरेटर कार डबे असतील.