Advertisement

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासधारकांनाच लोकल प्रवासाची मुभा

मुंबई लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी बंद असली तरीही बोगस ओळखपत्र तयार करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासधारकांनाच लोकल प्रवासाची मुभा
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना कोरोनाच्या धोक्यापासून दिलासा मिळत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, तरीही अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं हे पाऊल उचललं आहे. मात्र असं असलं तरी देखील बोगस ओळखपत्राच्या सहाय्यानं अनेकजण प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळं या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी बंद असली तरीही बोगस ओळखपत्र तयार करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दीचे प्रमाण वाढले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असं या सिस्टिमचं नाव असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच क्युआर कोडचा पास दिला जाणार आहे. क्युआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. कर्मचाऱ्यांकडे हे ओळखपत्र असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे.

तसंच, क्युआर कोड असलेले पास स्मार्टफोन किंवा क्युआर रिडर मशीनद्वारे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळं ते पास बनावट आहेत का हे ओळखण्यास मदत होणार आहे. क्युआर कोड सिस्टिममुळं बोगस ओळखपत्रावरुन प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

Advertisement

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्युआर कोड असलेला पास मिळाला की रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरुन त्यांना पास व तिकीट मिळू शकते. याबाबतीत राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांना पत्र दिलं आहे. मात्र, क्यु-आर कोड सिस्टिम कधीपर्यंत लागू होईल याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

युनिव्हर्सल ट्र्रॅव्हल पास मिळवण्यासाठी सरकारने खास वेबसाईट https://epassmsdma.mahait.org/ तयार केली आहे. लोकल प्रवासासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला या वेबसाईटच्या माध्यमातून पास मिळवता येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा