Advertisement

बेस्ट बसमध्ये पुन्हा होणार ट्रायमॅक्स मशीनचा वापर

बेस्टमधील कंडक्टरची टिकटिक आता बंद होणार आहे. कारण, बेस्ट प्रशासन पुन्हा ट्रायमॅक्स मशीन्सचा वापर करणार आहे.

बेस्ट बसमध्ये पुन्हा होणार ट्रायमॅक्स मशीनचा वापर
SHARES

बेस्टमधील कंडक्टरची टिकटिक आता बंद होणार आहे. कारण, बेस्ट प्रशासन पुन्हा ट्रायमॅक्स मशीन्सचा वापर करणार आहे. काही महिन्यांपुर्वी ई-तिकीट यंत्रणा योग्य पद्धतीने चालत नसल्यामुळं उपक्रमावर सातत्यानं टीका केली जात होती. परंतू, ई-तिकिटिंग पुरविणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीनं हा तांत्रिक बिघाड दूर केल्यानं ट्रायमॅक्स मशिन्स नव्यानं वापरात आणल्या जात आहेत. तसंच, बेस्टच्या पाच डेपोंमध्ये कंडक्टरच्या हाती या ट्रायमॅक्स मशीन्स देण्यात आल्या आहे.


ट्रायमॅक्समध्ये तांत्रिक बिघाड

२०१० मध्ये बेस्ट उपक्रमात ई-तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड सर्व्हिस कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र, बेस्ट उपक्रमात या मशिन्स कार्यन्वित झाल्यावर काही काळानंतर त्या मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागले. त्यामुळं तिकीट पुरवठ्यात अडचणी येत असून, उपक्रमाच्या महसुलातही घट होत होती. 


पाच डेपोमध्ये मशीनचा वापर

दरम्यान, बेस्टकडं ट्रायमॅक्सच्या एकूण साडे नऊ हजार मशिन आहेत. यामधील अनेक मशिन बंद झाल्यानं पुन्हा कागदी तिकिटांचा वापर करण्यात आला. मात्र, या मशीन दुरूस्त करण्यासाठी बेस्टनं अनेक प्रयत्न केले होते. बेस्टच्या या प्रयत्नांना आता यश आलं असून, बेस्टच्या गोराई, मागाठाणे, मालवणी, मरोळ आणि मजास या पाच आगारांमध्ये मशीन दुरुस्त करून वापरात आणली जात आहेत. त्याशिवाय, दुरूस्त करण्यात आलेल्या या ट्रायमॅक्सच्या मशीनमध्ये चिप बदलून नवीन टाकण्यात आली आहे. तसंच, बॉडी आणि की पॅड बदलण्यात आलं आहेत.



हेही वाचा -

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध

कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला मिळणार उत्तर मुंबईतील उमेदवारी?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा