देशातील दुसरी स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत (ट्रेन- १८) या महिन्याच्या अखेरीस इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) चेन्नई मधून बाहेर पडेल. ही ट्रेन दिल्ली ते मुंबई दरम्यान धावण्याची शक्यता आहे. वंदे भारत ट्रेन प्रति तास १३० किमी इतक्या वेगाने धावू शकते. त्यानुसार ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेस पाठोपाठ सर्वाधिक वेगाने धावणारी ट्रेन ठरू शकते.
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, मागणीकडे पाहता वंदे भारत ट्रेन दिल्ली ते मुंबई दरम्यान धावू शकते. पहिली वंदे भारत ट्रेन सध्या दिल्ली ते इलाहाबाद दरम्यान धावत आहे. प्रति तास १०० किमी पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या या ट्रेनने सरासरी वेगाच्या बाबतीत राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्स्प्रेसला मागे टाकलं आहे.
ही ट्रेन दिल्ली-मुंबई दरम्यान धावल्यास राजधानी एक्स्प्रेसपेक्षा ४ तासांहून कमी वेळात नियोजीत स्थळी पोहोचू शकेल. मुंबई राजधानी एक्स्प्रेस दिल्ली-मुंबईचं (१३५८ किलोमीटर) अंतर १६ तास ५ मिनिटांत पूर्ण करते. तर वंदे भारत ट्रेन हेच अंतर केवळ १२ तासांत पूर्ण करेल.
राजधानी एक्स्प्रेसला एकूण ५ थांबे आहेत. परंतु वंदे भारत ट्रेनचे थांबे कमी असू शकतात. जनावरांचे अपघात रोखण्यासाठी या ट्रेनला कॅटलगार्ड लावण्यात आलं आहे. तर दगडफेकीपासून ट्रेनला सुरक्षित ठेवण्यासाठी कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.
हेही वाचा-
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदी मंदावली
एसी लोकलची एप्रिलमध्ये १ कोटी ८३ लाख कोटींची कमाई