Advertisement

फुकट्यांना पश्चिम रेल्वेचा दणका, १५.३४ कोटींचा दंड वसूल


फुकट्यांना पश्चिम रेल्वेचा दणका, १५.३४ कोटींचा दंड वसूल
SHARES

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात अभियान राबवत २०१८ या वर्षी जानेवारी ते एप्रिल पर्यंत ३ लाख ९४ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. 


१४१ जणांची तुरुंगात रवानगी

रेल्वेने फुकट्यांकडून १५.३४ कोटी रुपयांचा दंडू वसूल केला आहे. हा दंड मागच्या वर्षी एप्रिल महिन्याच्या तुलनेत २६ टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय रेल्वेने ७२८ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना धुडकावून लावलं आहे. याप्रकरणात १४१ जणांची तुरुंगात रवानगी केली आहे.


२०० जणांवर कारवाई

जानेवारी ते एप्रिल २०१८ पर्यंत, दलाल आणि रेल्वे प्रवासादरम्यान अन्य प्रवाशांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध पश्चिम रेल्वेने २०० जणांवर कारवाई केली. याशिवाय रेल्वेने १२ वर्षाहून कमी वयाच्या ५९ शाळकरी मुलांना रेल्वेच्या महिला डब्यातून प्रवास करताना पकडलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा