Advertisement

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ

जाणून घेऊयात टाईमटेबल

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ
SHARES

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, 27 नोव्हेंबर 2024 पासून पश्चिम रेल्वेने (western railway) एसी लोकलच्या (AC local) संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

13 नवीन एसी फेऱ्या सुरू केल्यामुळे, एसी सेवांची एकूण संख्या आता आठवड्याच्या दिवशी 96 वरून 109 आणि शनिवार आणि रविवारी 52 वरून 65 होईल. 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, एसी लोकल ट्रेनमधून (AC local trains) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी सामान्य श्रेणीच्या 12 लोकल रद्द करून त्याजागी 13 एसी लोकल (mumbai local) सुरू करण्यात येणार आहे.

या सेवा संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. तसेच एकूण फेऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. 

या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून दुपारी 12:34 वाजता धावेल. तसेच नवीन दाखल झालेल्या सर्व एसी लोकल (mumbai local news) खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार नियमितरित्या धावतील.

UP मार्गावर विरार - चर्चगेट आणि भाईंदर - चर्चगेट दरम्यान प्रत्येकी 2 सेवा आणि विरार - वांद्रे आणि भाईंदर - अंधेरी दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे.

त्याचप्रमाणे, DOWN मार्गावर चर्चगेट - विरार दरम्यान 2 सेवा, चर्चगेट - भाईंदर, अंधेरी - विरार, वांद्रे - भाईंदर, महालक्ष्मी - बोरीवली आणि बोरिवली - भाईंदर दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे.



हेही वाचा

मनसे चिन्ह गमावणार?

पसंतीचा वाहन क्रमांक आता घरबसल्या मिळवा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा