Advertisement

सीएसएमटी ते गोरेगाव प्रवास होणार वेगवाग, 'हे' बदल केले

सध्या या स्थानकादरम्यान तांत्रिक कामे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.

सीएसएमटी ते गोरेगाव प्रवास होणार वेगवाग, 'हे' बदल केले
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून हार्बर मार्गे गोरेगावला जाणाऱ्या प्रवाशांचा लोकल प्रवास आता वेगवान होणार आहे. गोरेगाव ते माहीम दरम्यान असलेल्या वळणाची तीव्रता कमी करण्यास पश्चिम रेल्वेला यश आलं आहे. या मार्गावरील वेगमर्यादा हटविण्यात आली आहे.

माहीम ते गोरेगाव दरम्यान विशेषतः माहीम स्थानक परिसरात तीव्र वळणामुळे अनेक ठिकाणी ३० किमी प्रति तास आणि त्याहून कमी अशी वेगमर्यादा होती. वेगाने तीव्र वळणावर रुळांवरून लोकल घसरून अपघात होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष कामे हाती घेतले होते. या वेगमर्यादेमुळे लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होत असे.

वळणाची तीव्रता कमी करण्यासाठी पंधरा दिवस माहीम स्थानकातील थांबा काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता.

सध्या या स्थानकादरम्यान तांत्रिक कामे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. येत्या दहा दिवसांत ही कामे पूर्ण केल्यानंतर या मार्गावरील वेगमर्यादा हटवण्यात येणार आहे. वेगमर्यादा हटवल्यानंतर लोकलचा वेग निश्चित वाढेल आणि त्याचा फायदा प्रवाशांना होऊन प्रवास वेळेत बचत होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

‘हे’ बदल आले करण्यात

  • माहीम स्थानकात ३५ किमी प्रति तास अशी वेगमर्यादा होती, ती लवकरच ५० किमी प्रति तास इतकी होणार आहे.
  • दादर आणि भाईंदर स्थानकातील वेगमर्यादा १५ वरून ३० किमी प्रति तास अशी बदलण्यात आलेली आहे.
  • अंधेरी ते गोरेगाव दरम्यानही काही ठिकाणी वेगमर्यादा हटविण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
  • वेग मर्यादेत बदल केल्यानंतर सरासरी ५ ते १० मिनिटे प्रवास वेळेत बचत शक्य होणार आहे.



हेही वाचा

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील 'या' लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसवर परिणाम होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा