पश्चिम रेल्वे (western railway) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वेलंकनी येथील सणानिमित्त अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी वांद्रे टर्मिनस (bandra) ते वेलंकनी (velankani) दरम्यान एक विशेष ट्रेन (special train)चालवणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या मते, ट्रेनचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-
*गाडी क्रमांक 09093/09094 वांद्रे टर्मिनस – वेलंकनी स्पेशल [4 फेऱ्या]*
गाडी क्रमांक 09093 वांद्रे टर्मिनस - वेलंकनी स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून मंगळवार 27ऑगस्ट 2024 ला आणि शुक्रवार 6 सप्टेंबर 2024 रोजी 21.20 वाजता सुटेल. आणि अनुक्रमे गुरुवार आणि रविवारी 08.30 वाजता वेलंकन्नीला पोहोचेल.
तसेच ट्रेन क्रमांक 09094 वेलंकनी - वांद्रे टर्मिनस स्पेशल वेलंकनी येथून गुरुवार 29 ऑगस्ट 2024 आणि रविवार 8 सप्टेंबर 2024 रोजी 22.00 वाजता सुटेल. आणि अनुक्रमे शनिवारी आणि मंगळवारी 15.00 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
ही विशेष गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, गुंटकल, कडप्पा, रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर कँट, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, कुड्डालोर पोर्ट, चिदंबरम, सिरकाझी, मायिलादुथुराई, तिरुवरूर आणि नागपट्टिनम स्टेशन दोन्ही दिशांना थांबेल
या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश आहे.
ट्रेन क्रमांक 09093 चे बुकिंग 09 ऑगस्ट 2024 पासून सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वरील ट्रेन विशेष ट्रेन म्हणून धावतील. थांबण्याच्या अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात.
हेही वाचा