खार - खारच्या प्रदर्शक गॅलरीमध्ये सोलो पेंटिंग एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 10 फेब्रुवारीपर्यंत खुलं राहणार आहे. यामध्ये चित्रकार शिल्पा पाचपोर यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पश्चिमी देशातल्या घाट आणि निसर्गाचं सौंदर्य पाहून ही चित्रे काढण्याची प्रेरणा मिळाल्याचं पाचपोर यांनी सांगितलं. शिल्पा पाचपोर यांनी आतापर्यंत अशी अनेक चित्रं रेखाटली आहेत.