Advertisement

अखेर ठरलं...रणवीर - दीपिका अडकणार लग्न बंधनात


अखेर ठरलं...रणवीर - दीपिका अडकणार लग्न बंधनात
SHARES

'पद्मावत' सिनेमाच्या रिलीजनंतर रणवीर आणि दीपिका या दोघांच्या लग्नाच्या चर्चेने वेग धरला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या डेस्टिनेशन वेडिंगनंतर आता रणवीर आणि दीपिकाही डेस्टिनेशन वेडिंग करतील इथपर्यंत चर्चेला उधाण आलं आहे. पण आजपर्यंत त्या दोघांनी कधी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. पण आता खुद्द रणवीरनेच आपण दीपिकासोबत लग्न करणार असल्याचं कबूल केलं आहे.

बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतरच रणवीर आणि दीपिकाच्या अफेरची जोरदार चर्चा सुरू झाली. या मेड फॉर इच अदर कपलचे अनेक बातम्या पुढे आल्या. प्रत्येक इव्हेंटला एकत्र असणं, एकमेकांबद्दलचं बोलणं यामुळे चर्चांना वेग आला. त्यातच रणवीरच्या आईने दीपिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तीला नेकलेस गिफ्ट केल्यामुळे या नात्यावर शिक्कामोर्तब झाला.


असा आहे लग्नाचा प्लॅन

विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता रणवीर आणि दीपिकाही लग्न करणार असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. त्याचबरोबर हे दोघं लंडनमध्ये समुद्र किनाऱ्यावर लग्न करणार आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच हा लग्नसोहळा पार पडेल.


काय म्हणाला रणवीर?

या चर्चेविषयी बोलताना रणवीर एका मुलाखतीत म्हणाला, मला माहीत नाही या चर्चेला कुठून सुरुवात होते. मी या वर्षी लग्न करण्याचा विचार करत आहे. मात्र माझा संपूर्ण दिवस हा कामात जातो. पण लग्न करण्याचा विचार नक्कीच सुरू आहे. पण केव्हा करेन माहीत नाही.

रणवीरच्या या बोलण्यानंतर लवकरच तो लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अर्थातच त्याची होणारी बायको ही दीपिका असेल यात शंकाच नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा