Advertisement

‘सिंबा’ची नायिका बनली सारा!


‘सिंबा’ची नायिका बनली सारा!
SHARES

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित सिम्बा या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सारा अली खान तयार झाली आहे. धर्मा प्रोडक्शनने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.


ही घोषणा करताना सुंदर कॅप्शन याला देण्यात आलं आहे. 'एक सुंदर नवा चेहरा+दोन सर्वात मोठ्या मेकर ची जादू+एका सुपरस्टारची एनर्जी = ब्लॉकबस्टर सिम्बा'. असं कॅपशन देत सारा अली खानच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सारा आणि रणवीर सिंग अशी फ्रेश जोडी या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


सिम्बासाठी या अभिनेत्रींची नाव चर्चेत

सिम्बा या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिम्बा या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. सर्वप्रथम जान्हवी कपूर सिम्बा करणार असल्याचीही बातमी होती. त्यानंतर मल्याळम अभिनेत्री प्रिया वारीयर या चित्रपटात दिसणार अशीही चर्चा रंगली. पण आता या चित्रपटासाठी साराची वर्णी लागली आहे.

सुरुवातीला करणने या चित्रपटासाठी साराला विचारणा केली होती. पण सारा आपल्या पहिल्या केदारनाथ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे तिने सिम्बाला नकार दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी केदारनाथ राखडल्यामुळे सारा ने सिम्बाला होकार दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा