Advertisement

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या गटबाजीवरुनही चर्चांना उधाण आलं आहे.

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्येच्या घटनेनंतर घराणेशाहीचा (Nepotism) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यात त्याच्या हातून ७ चित्रपट गेल्याची चर्चा आहे. याशिवाय बॉलिवूडच्या (Bollywood) मोठ्या मीडिया हाऊसनं त्याला बॅन केल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे तो नैराश्यात गेल्याचं बोललं जातंय. पण यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.   

पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, करण जोहर (Karan johor), सलमान खान (Salman Khan), एकता कपूर (Ekta kapoor), संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासह आठ जणांविरोधात पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ओझा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लावलेले आरोप सिद्ध झाल्यास, या सर्वांना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

या तक्रारीमध्ये सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले, असा आरोप सुधीर ओझा यांनी केला आहे. सुधीर यांनी आठ कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे.


त्यामध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात कलम ३०९, १०९, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे.

सध्या सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट झाले आहेत. एक गट करण जोहरच्या बाजूनं तर दुसरा गट सुशांतच्या बाजूनं बोलत आहे. प्रकाश राज, रवीना टंडन, दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यासह अनेक जण उघडपणे घराणेशाहीवर आपलं मत व्यक्त केलं. आहे. बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या गटबाजीवरुनही चर्चांना उधाण आले आहेत.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले होते.



हेही वाचा

सुशांत सिंहची ५० स्वप्नांची ड्रीम लिस्ट, पण त्याआधीच...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा