डांसर कोरिओग्राफर रेमो डिसूजाला शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर रेमोला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे रेमोवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली. सध्या रेमोला आयसीयूत शिफ्ट करण्यात आलं आहे.
नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेमो यांना भेटण्यासाठी अहमद खान रुग्णालयात जाणार आहेत.
सध्या रेमोची पत्नी लिज डिसूझा त्यांच्यासोबत रूग्णालयात हजर आहे. एंजियोग्राफी केली असून रेमो सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे.
दरम्यान, कोरिओग्राफर आणि अॅक्टर धर्मेश येलांडेनं ई-टाइम्सकडून बातमीची पुष्टी केली आहे. त्यानं लिहलं की, हो ही बातमी बरोबर आहे. रेमो सर आता ठीक आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत हॉस्पीटलमध्ये आहोत.