Advertisement

दीपिका बनणार रोमी भाटीया!

चित्रपटसृष्टीत दाखल झाल्यापासून दीपिका पदुकोणनं साकारलेल्या सर्वच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. आता ती रोमी भाटीयांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दीपिका बनणार रोमी भाटीया!
SHARES

चित्रपटसृष्टीत दाखल झाल्यापासून दीपिका पदुकोणनं साकारलेल्या सर्वच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. आता ती रोमी भाटीयांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


प्रेक्षकांवर मोहिनी

दीपिका आणि रणवीर सिंग या रिअल लाईफ कपलनं रील लाईफमध्येही आपली जोडी जमवत प्रेक्षकांवर मोहिती घातली आहे. 'गोलियों की रासलीला राम-लीला'पासून सुरू झालेली ही लव्हस्टोरी 'बाजीराव-मस्तानी'नंतर 'पद्मावत'पर्यंत येऊन पोहोचली. 'पद्मावत'मध्ये दोघेही एकमेकांच्या अपोझीट असूनही प्रेक्षकांचे फेव्हरेट ठरले हे विसरता कामा नये. त्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकलेली ही जोडी केवळ जाहिरातींमध्येच सोबत दिसली. आता ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


क्रिकेटचा कसून सराव

रणवीर मागील काही महिन्यांपासून '८३' या कबीर खानच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी क्रिकेटचा कसून सराव करत आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पटकावलेल्या पहिल्या विश्वचषकाची यशोगाथा '८३'मध्ये पहायला मिळणार आहे. त्यासोबतच विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे कप्तान कपिल देव यांच्या जीवनावरही हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर साकारत असून, या चित्रपटाची सह-निर्माती असलेली दीपिकाही यात कॅमिओ करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार दीपिका रोमी भाटीयांची भूमिका साकारणार असल्याचं समजतं.


ऐतिहासिक कामगिरीच्या साक्षीदार

क्रिकेटचाहत्यांना रोमी भाटीया या कोण आहेत, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आपल्या आवडत्या क्रिकेटरची पत्नी कोण आहे हे बऱ्याच चाहत्यांना ठाऊक असतं. रोमी या कपिल देव यांच्या पत्नी आहेत. कायम कपिल यांना प्रोत्साहित करणाऱ्या रोमी यांची भूमिकाही या चित्रपटात महत्त्वाची ठरू शकते. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या त्या ऐतिहासिक कामगिरीच्या रोमीदेखील साक्षीदार आहेत. ज्यावेळी एका मागोमाग एक भारतीय संघाच्या विकेट्स पडत होत्या, तेव्हा रोमींना ते पहावत नव्हतं आणि त्या स्टेडीयमबाहेर गेल्या होत्या, पण भारतीय संघ विजयपधावर परतल्याचं समजताच त्या स्टेडियममध्ये परतल्या होत्या. 


रोमींच्या भूमिकेत दीपिका ?

चित्रपटातील हा क्लायमॅक्सचा भाग अत्यंत भावनिक आणि महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळं कबीर खानसारखे दिग्दर्शक हा भाग नाट्यमय पद्धतीनं वापरू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे. या सीनमध्ये रोमींच्या भूमिकेत दीपिका बाजी मारू शकते. दीपिका या चित्रपटाची सह-निर्माती असल्यानं ती रोमींच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या तरी सारं काही गुलदस्त्यात आहे. मिळालेली माहिती खरी ठरली तरी प्रेक्षकांना पुन्हा एकदा रीअल लाईफमधील जोडी रील लाईफमध्ये पाहायला मिळेल. दीपिकाची निर्मिती असलेला '८३' हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. याशिवाय मेघना गुलजारच्या 'छपाक'मध्ये मुख्य भूमिकेसोबत दीपिका चित्रपटाची निर्मितीही करत आहे.



हेही वाचा -

टी- २० मुंबई लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरूवात

सायबर चोरट्यांनी लोकलच्या मोटरमनला दहा लाखाला गंडवलं



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा