कारकीर्द संपत आली तरी काही कलाकारांचं डबल रोल करण्याचं स्वप्न साकार होत नाही, पण श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवीला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
'सैराट' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'धडक'द्वारे बॅालिवुडमध्ये बेधडक एंट्री केलेली जान्हवी 'रुह अफ्जा' या आगामी हिंदी चित्रपटात प्रथमच दुहेरी भूमिका साकारणार आहे. 'रुह अफ्जा' हा चित्रपट बऱ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. 'रूह अफ्जा' हे खरं तर सरबत म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा वापर शीर्षकासाठी केल्यानं नेमकं या चित्रपटात काय पहायला मिळणार याची उत्सुकता वाढते. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार असल्यानंही या चित्रपटाबाबत कुतूहल वाटतं. असो, पण आता या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'रूह अफ्जा'चा क्लीप बोर्ड शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी २० मार्चला प्रदर्शित होणार आहे.
मॅडॅाक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते दिनेश विजान आणि मृगदीप सिंग लाम्बा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन हार्दिक मेहता करत असून, वरुण शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जान्हवीनं या चित्रपटात डबल रोल साकारण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. कपूर घराण्यातील डबल रोल साकारणारी जान्हवी ही या पिढीतील पहिली फॅमिली मेंबर बनली आहे. यापूर्वी जान्हवीची आई श्रीदेवीनं 'चालबाज'मध्ये, तर काका अनिल कपूरनं 'किशन कन्हैया' या चित्रपटांमध्ये साकारलेल्या दुहेरी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. जान्हवीलाही 'रूह अफ्जा'मध्ये अशीच काहीशी कमाल करावी लागणार आहे. या चित्रपटाखेरीज करण जोहरच्या 'तख्त' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, अनिल कपूर, करीना कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत झळकणार आहे.
हेही वाचा -
जॅान-इम्रानसह जॅकी-सुनीलचा 'मुंबई सागा'
टायगर-दिशाचा डान्सिंग व्हिडीओ पाहिला का?