Advertisement

कार्तिक आणि साराचा 'लव आज कल'

कार्तिक आणि सारा या जोडीला एकत्र पाहण्यास चाहते इच्छुक होते. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

कार्तिक आणि साराचा 'लव आज कल'
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी ‘लव आज कल’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. गेले काही महिने कार्तिक आणि साराच्या 'लव आज कल' या चित्रपटाची चर्चा होती. कार्तिक आणि सारा या जोडीला एकत्र पाहण्यास चाहते इच्छुक होते. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

आता प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोघांची जोडी जबराट दिसत आहे. कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये झोपलेला दिसत आहे. त्याच्यासोबत सारा देखील आहे. एकमेकांच्या प्रेमात आकुंठ बुडालेले पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. सारा आणि कार्तिकनं ‘लव आज कल’ या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. गेले वर्षभर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपले रिलेशनशिप स्टेटस मान्य देखील केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. विशेष म्हणजे आता ‘लव्ह आज कल’च्या रिमेकमध्ये सैफची लेक सारा अली खान पाहायला मिळणार आहे.

१४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी सारा आणि कार्तिक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यानं केलं आहे



हेही वाचा

सलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'

कपिल शर्माच्या गोंडस मुलीचा फोटो पाहिलात का?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा