Advertisement

कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं 'सूर्यवंशी'ची नायिका कतरीना कैफ असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषित केलं आहे. 'वेलकमींग 'सूर्यवंशी' गर्ल आॅन बोर्ड, कतरीना कैफ!' असं ट्वीट करत करणनं अक्षय, कतरीना आणि रोहितसोबतचा आपला फोटो करणनं शेअर केला आहे. '

कतरिनानेच मारली बाजी; पुन्हा बनली अक्षयची नायिका
SHARES

निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीनं रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'सिम्बा' चित्रपटाच्या शेवटी आपल्या आगामी चित्रपटाची झलक दाखवली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असला तरी त्याची नायिका कोण? हे रहस्य मात्र उलगडलं नव्हतं. या चित्रपटात अक्षयची नायिका बनण्याच्या शर्यतीत अखेरीस कतरीना कैफनं बाजी मारली आहे.


सोशल मीडियातून घोषणा

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं 'सूर्यवंशी'ची नायिका कतरीना कैफ असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषित केलं आहे. 'वेलकमींग 'सूर्यवंशी' गर्ल आॅन बोर्ड, कतरीना कैफ!' असं ट्वीट करत करणनं अक्षय, कतरीना आणि रोहितसोबतचा आपला फोटो करणनं शेअर केला आहे. 'सिम्बा'नंतर अक्षयसोबत रोहित 'सूर्यवंशी'च्या कामाला लागणार हे सर्वांनाच ठाऊक होतं, पण या चित्रपटात अक्षयची नायिका कोण बनणार याची उत्सुकता लागली होती.


चाहत्यांसाठी खुशखबर

अक्षयची नायिका बनण्याच्या शर्यतीत सुरुवातीला 'मोहें जो दारो' फेम पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडीस या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा होती, पण ही नावं त्या पलीकडं मजल मारू शकली नाहीत. अखेर कतरीनाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या चित्रपटात कतरीनाची एंट्री होणं ही अक्षय-कतरीनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर मानली जात आहे. यापूर्वी या जोडीनं 'हमको दीवाना कर गए', 'सिंग इज किंग', 'ब्ल्यू', 'नमस्ते लंडन', 'तीस मार खान', 'वेलकम', 'दिल परदेसी हो गया', 'दे दना दन' आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.


पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अक्षयचा लुक दर्शवणारं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. ज्यामध्ये अक्षय पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून, त्यानं डोळ्यांवर काळा गॅागल घातला आहे. आता लवकरच कतरीनाचाही लुक रिव्हील करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. पोस्टरसाठी कतरीनाचंही शूट पूर्ण करण्यात आलं असून, अक्षयप्रमाणे पहिल्या पोस्टरमध्ये तीदेखील खाकीत दिसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 


 कन्नड चित्रपटाचा रिमेक 

'सूर्यवंशी' हा चित्रपट 'तगारू' या कन्नड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. रोहितचं लाडकं लोकेशन असलेल्या गोव्यामध्ये काही दिवसांपूर्वीच 'सूर्यवंशी'चं पहिलं शूटिंग शेड्युल पूर्ण करण्यात आलं आहे. 'अ बुलेट फॅार अ बुलेट' अशी टॅगलाईन असलेलं 'सूर्यवंशी'चं पोस्टर या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं संकेत देणारं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

पहा, सलमानच्या रंगीन जीवनाचा फ्लॅशबॅक!

रणबीर बनला सुपरपॅावर असलेला डीजे!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा