Advertisement

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे.

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
SHARES

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार ( dadasaheb phalke award) जाहीर झाला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी अभिनेते मिथुन चक्रवर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना चाहते प्रेमाने मिथुन दा असंही संबोधतात. आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती ( mithun chakraborty ) यांनी शेकडो चित्रपटांमध्ये (movies)  काम केलं आहे. विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

तसंच तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे. 

1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली. ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. 100 कोटी क्लबमध्ये गेलेला हा हिंदी सिनेसृष्टीतला (bollywood)  पहिला चित्रपट होता.



हेही वाचा

मुंबई-पुणे अंतर कमी होणार

पश्चिम रेल्वेवर सोमवारी गोरेगाव ते मालाड दरम्यान ब्लॉक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा