'सेक्रेड गेम्स' द्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सैफ अली खान आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. तो कुठल्या रिअॅलटी शोचा जज म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार नाही. तर तो एका मालिकेत सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
संदीप सिकंद निर्मित ‘कहाँ हम, कहाँ तुम’ ही मालिका लवकरच स्टार प्लस या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोसाठी बॉलिवूडचा नबाब सैफ अली खाननं मुंबईत नुकतंच शूट केलं. या प्रोमोमध्ये ‘कहाँ हम, कहाँ तुम’ या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांची ओळख सैफ प्रेक्षकांना करून देणार आहे.
मालिकेत अनेक नामवंत कलाकार भूमिका साकारत आहेत. दीपिका कक्कर आणि करण व्ही. ग्रोव्हर या कलाकारांचा देखील या मालिकेत समावेश आहे. अगदीच भिन्न स्वभाव असलेल्या एका दाम्पत्याची कथा संदीप सिकंद या मालिकेतून सादर करणार आहेत.
हेही वाचा-