Advertisement

प्रसिद्ध गायक नितीन बालींचं अपघाती निधन


प्रसिद्ध गायक नितीन बालींचं अपघाती निधन
SHARES

प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा सोमवारी रात्री अपघाती निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी मालाड येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी अटक केली. घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


उपचारादरम्यान मृत्यू

नितीन बाली यांच्यावर कस्तुरबा पोलिसांनी मद्यप्राशन करून गाडी चालवत बोरिवलीहून मालाडच्या दिशेने जात होते. त्यावेळी बोरिवली येथे त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे किरकोळ अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नितीन हे मद्यप्राशन केल्याच्या अवस्थेत होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत, त्यांची जामीनावर मुक्तता केली.

घरी आल्यानंतर अचानक नितीन यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृ्त्यू झाला.


90च्या दशकातील प्रसिद्ध गायक

नितीन बाली 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक होते. रिमिक्स गाण्यांसाठी ते ओळखले जात होते. 'नीले नीले अंबर पे', 'छुकर मेने मन को', 'एक अजनबी हसिना से', 'पल पल दिल के पास' यांसारखी अनेक गाण्यांना त्यांनी रिमिक्स केलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा