Advertisement

'कुडीए नी' म्हणत येणार अपारशक्तीचं सिंगल

अभिनेता आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाही आपल्या लहानसहान भूमिकांद्वारे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. आता तो आपलं 'कुडीए नी' हे पहिलं सिंगल रसिकांच्या भेटीला आणत आहे.

'कुडीए नी' म्हणत येणार अपारशक्तीचं सिंगल
SHARES

अभिनेता आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाही आपल्या लहानसहान भूमिकांद्वारे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. आता तो आपलं 'कुडीए नी' हे पहिलं सिंगल रसिकांच्या भेटीला आणत आहे.


सिंगल व्हिडीओ साँग

अपारशक्ती खुराना हे नाव उच्चारताच क्षणर्धात डोळ्यांसमोर उभा राहतो तो त्यानं 'दंगल' चित्रपटात साकारलेला हरियाणवी ओंकार. आमिर खानसोबतची त्याची केमिस्ट्री आणि विनोदनिर्मिती करण्याचा त्यानं केलेला यशस्वी प्रयत्न. त्यानंतर जवळजवळ अर्धा डझन चित्रपट करणाऱ्या अपारशक्तीनं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'लुका छिपी'मध्ये साकारलेला अब्बासही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हाच अपारशक्ती आता गायक-संगीतकाराच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३१ जून रोजी अपारशक्तीचं 'कुडीए नी' हे सिंगल व्हिडीओ साँग प्रदर्शित होणार आहे.


अपारशक्ती-सरगुनवर गाणं 

'कुडीए नी' हे गीत अपारशक्तीनंच लिहिलं असून, संगीतबद्धही केलं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून कॅन्सर झाल्यामुळं चर्चेत असणारी आयुष्मानची पत्नी आणि अपारशक्तीची वहिनी ताहिरा कश्यप-खुरानानं या व्हिडीओ साँगचं दिग्दर्शन केलं आहे. अपारशक्ती आणि नीती मोहन यांची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती टी-सिरीजच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. अपारशक्ती आणि सरगुन मेहता यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. चित्रपटांमध्ये भूमिका साकारता साकारता अपारशक्ती आपल्यातील इतर कलागुणंनाही वाव देण्याचं काम करत असल्याचं 'कुडीए नी'च्या निमित्तानं लक्षात येतं.


अपारशक्तीकडं काही चित्रपट 

'दंगल' आणि 'स्त्री' या चित्रपटांमधील व्यक्तिरेखांसाठी पुरस्कारास पात्र ठरलेल्या अपारशक्तीकडं सध्या काही चित्रपट आहेत. 'जबरीया जोडी', 'स्ट्रीट डान्सर' आणि 'कानपुरीए' या आगामी हिंदी चित्रपटांमध्ये अपारशक्ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. 'जबरीया जोडी'मध्ये तो बलबीर ही व्यक्तिरेखा साकारत आहे, तर 'स्ट्रीट डान्सर'साठी तो सरदारजी बनला आहे. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग सध्या सुरू असून, 'कानपुरीए'बाबत अद्याप फारशी अधिकृत माहिती मिळालेली नाही.



हेही वाचा -

'८३'मधील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का?

'बिग बॉस २' मधील पहिलं नॅामिनेशन




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा