Advertisement

मुंबई महापालिकेविरोधात सोनू सूद हायकोर्टात

पालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता सोनू सूद याने मुंबई महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई महापालिकेविरोधात सोनू सूद हायकोर्टात
SHARES

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता सोनू सूद याने मुंबई महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सोमवारी या प्रकरणी सुनावणी केली जाणार आहे. 

कंगणा रानावत आणि मुंबई महापालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सुद विरुध्द मुंबई महापालिका असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. पालिकेने जुहू येथील शक्ती सागर सहा मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरु केल्याचा आरोप सोनू सुदवर केला आहे. याप्रकरणी

पालिकेने ४ जानेवारी रोजी जुहु पोलीस ठाण्यात सोनू सुदविरोधात तक्रार दाखल केली होती. सोनू सुदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचे कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे.  या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे, असे पालिकेने तक्रारीत म्हटले होते. तर  सोनू सूदने या इमारतीत कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 



हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा