Advertisement

HDFC, ICICI बॅंकेच्या वेळेत बदल

कोरोनाचं वाढतं संकट पाहून बँकांनी खबरदारी घेत आपल्या कामकाजात काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत.

HDFC, ICICI बॅंकेच्या वेळेत बदल
SHARES

कोरोनाचं वाढतं संकट पाहून बँकांनी खबरदारी घेत आपल्या कामकाजात काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दोन्ही बँका कार्यरत राहणार आहे. याशिवाय. ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वापर करावा, असं आवाहन बँकांकडून करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून या बँकांनी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे. तसंच परदेशी चलन बदलणं आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. बँकेनं ग्राहकांना यासंबंधी सुचनादेखील पाठवल्या आहेत.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून बदल केल्याची माहिती दिली आहे. “आमच्या सर्व शाखांमध्ये स्वच्छतेविषयी विशेष लक्ष देण्यात येईल. तसंच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी राहिल. तसंच ग्राहक मदत केंद्रांमध्येही कर्मचाऱ्यांची संख्या कमी राहिल. आम्ही सुरक्षेवर लक्ष देण्याचं आवाहन करत आहोत. तसंच महत्त्वाच्या बँकींग सेवांसाठी आय-मोबाईल किंवा इंटरनेट बँकींगचा वापर करावा,” असं बँकांकडून सांगण्यात आलं आहे.

एचडीएफसी बँकेनं शाखांमधील गर्दी कमी करण्यासाठी ड्रॉपबॉक्समध्ये चेक टाकण्यास सांगितलं आहे. तसंच पासबुक अपडेट आणि फॉरेक्स कार्ड रिलोड सारख्या सुविधांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस आणि यूपीआयसारख्या माध्यमांचा वापर करून ट्रान्झॅक्शन करण्यास बँकेनं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त यूपीआय किंवा पेझॅपसारख्या माध्यमांचा वापर करून बिलांचा भरणा करावा, असंही बँकेनं नमूद केलं आहे.



हेही वाचा -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा